‘मसाला’ चित्रपट निर्मिती मागील आमची भूमिका

                                                ---------------------------------------------------------------------------
प्रविण मसालेवाले या आमच्या कंपनीचे हे व सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. १९६२ साली आदरणीय श्री. हुकमीचंदजी चोरडिया (श्री. भाऊं) व सौ. कमलबाई चोरडिया (सौ. बाई) यांनी लावलेल्या या रोपटयाचे एका डेरेदार वृक्षात रूपांतर झाले. श्री. भाऊंनी नुकतेच ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या दोन्ही सुवर्णक्षणांचा दुग्धशर्करा योग या वर्षात आलेला आहे.

प्रविण मसालेवाले परिवाराच्या सानिध्यात, संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्री. भाऊ व सौ. बाईंपासून सतत प्रेरणा मिळते, नवसंजीवनी मिळते. प्रविणच्या प्रवासात या दोघांच्याही विविध वैषिटयांची जाणीव पदोपदी होत असते.

भाऊंची तत्वे, ध्येय, विचार, कृती मग ती व्यावसायिक असोत किंवा जीवनाची असोत त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही. सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याच्या स्वभावामुळे व्यवसायाची मजबूत बांधणी शक्य झाली. सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने आणि अडीअडचणीला खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याच्या वागणुकीमुळे भाऊंचा व्यावसायिक, पारीवारीक आणि सामाजिक स्नेह परिवार मोठा होत गेला.

स्वतः बरोबर इतरांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी कायम प्रयत्नशील असणे हा त्यांच्यात असलेल्या गुणांमधील प्रमुख गुण. भाऊंचे जीवन अनेक अपयशांच्या मुशीतुन तावून सलाखून निघालेले आहे. कित्येक अपयशी घटना त्यांच्या वट्याला आल्या पण त्यात न खचता किंवा तेथेच न थांबता पुढील वाटचालीसाठी ते सज्ज असत. पुढील प्रवास कसा असेल किंवा पुढे काय हा प्रश्न त्यांना पडला तरी आलेल्या प्रसंगातून मार्ग कसा काढायचा यावर त्यांचे प्रयत्न असत.

ज्या समाजाने आंम्हाला भरभरून प्रेम दिले, आदर दिला व विश्वस दाखिवला त्या समाजाला आम्हीही काही देण लागतो. भाऊंनी जोपासलेल्या मुल्यांना अभिवादन करण्यासाठी या घटनांची, कामगीरीची माहिती एका कथेच्या दिशादर्शक कलाकृतीतुन मनोरंजनाच्या माध्यमातून ती समाजासमोर आणताना आनंद होत आहे.

प्रत्येकाच्या जीवनाची व जगण्याची लज्जत वाढावी या साठी आम्ही या चटपटीत ‘‘मसाला’’ चित्रपटाची निर्मिती केली असुन तो आपल्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे.

                                                                                                                                  - विशाल चोरडिया

 
© 2012 Masala Film