‘मसाला’ हा माझा पहिलाच चित्रपट. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना खूप उत्साह असतो आणि आपण ठरवलेले सगळे हवे तस घडतयं ना याची धाकधुकी असते. या काळातही माझी धावपळ बघून आई म्हणाली, ‘‘हे माझा एक बालपणच आहे रे’’ गंमत म्हणजे याच काळात माइया बहिणीच्या बाळांतपणाची आम्ही फोनवरूनच एकमेकांच्या डोहाळयांची चैकषी करायचा. माझे शुटिंग चालू असताना तिला मुलगी झाली आणि पाठोपाठ चित्रपट पूर्ण झाला आता आम्ही दोघे आपापल्या बाळांची काळजी घेण्यात मग्न आहोत.


मला चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेची खूप मजा वाटते. एक धुसरशी कल्पना अणि पडद्यावर दिसणारा चित्रपट हया मध्ये जे काही घडते ते फारच विलक्षण असते. कित्येक जणांचे हात त्याला लागतात. कुठल्याही चित्रपटाची श्रेय नामावली वाचल्यावरही हे लक्षात येऊ शकते. टीममधला प्रत्येक जण त्या चित्रपटामध्ये आपापल्या परीने जीव ओतत असतो. त्या सगळयांच्या उर्जेच्या एकत्रित परिणामातून चित्रपट तयार होतो. त्यामुळे माझा चित्रपट म्हणताना मला भान आहे की, हयातला ‘मी’ हा प्रतिनिधिक आहे. या निर्मितीच्या वतीने अनेकांनी अनुभवल्या आहेत.


माइया सुदैवाने मसाल्याची बहुतेक सगळी टीम मित्रांची होती. सुरुवातच उमेश आणि गिरीश या मित्रांनी झाली. त्यात अनेक नव्या जुन्या मित्रांची भर पडत गेली आणि प्रक्रिया सोपी झाली.


दिग्दर्शक चित्रपटाबरोबर सगळयात जास्त काळ असतो. चित्रपटाची गोष्ट, त्यातली माणसे ही लेखनापासून ते चित्रपट पूर्ण होईपर्यंत त्याच्या सोबतच असतात. मसाल्याची नर्म विनोदी शैलीतली गोष्ट जगण्यासाठी उर्जा देणारी आहे. हयातली माणसे ही हवीहवी्शी वाटणारी आणि नात्यातल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत घालवलेला काळ माइयासाठी खूपच आनंददायी आहे. तसेच तो प्रेक्षकांसाठी असावा ही इच्छा!
                                                                                                                                                   - संदेश कुलकर्णी

© 2012 Masala Film