![](images/katha.png)
मसाला ची रूपरेषा
काही लोकं आपले जीवन सुधारण्याकरीता वेगवेगळे तत्वज्ञान आजमावतात. तर काही जणं आपलं आयुष्यच इतरांकरीता एक तत्वज्ञान बनवितात. "मसाला" ह्या सिनेमाची गोष्टं ही एका अशा व्यक्ती ची गोष्टं आहे जो त्याच्या प्रगतीच्या, मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटाला झुगारून पुढे जातो.
"मसाला" ची प्रेरणा ही प्रवीण मसालेवाले चे प्रणोत हुकमीचंदजी चोरडीयांच्या आयुष्यावरून मिळालेली आहे.
सिनेमात रेवण आणि सारिका आपल्या निर्वाहाकरीता काय काय करतात ह्याच चित्र दाखवलं गेलं आहे. कशा प्रकारे ते वेगवेगळे उद्योग करतात, पण एकामागे एक प्रयास विफ़ल ठरतात.रेवण हा खरा जिद्दी माणूस असल्याने आपले ध्येय साध्य करण्याकरीता तो वेगवेगळ्या शहरातून फ़िरतो. त्यांच्या उद्योगामुळे त्याला आणि त्याच्या बायकोला "सारिकाला" सोलापूर सारख्या एक लहान शहरात यावे लागते, जिथे तो आपल्या मेहुण्याबरोबर एक नवीन धंदा सुरू करतो. इमानदारी आणि मेहनतीने, तो स्वत:ची एक ओळख निर्माण करतो.आणि मग तो अशा एका प्रवासावर जायला निघतो, जिथे त्याला सुखाकरता नव्हे तर आनंदाकरीता गोष्टी करता येतील.
सिनेमा हा " प्रत्येकच प्रयोग हा आपल्याला काही तरी शिकवून जातो, त्यामुळे त्याला अयशस्वी म्हणता येत नही" ह्या तत्वज्ञानावर आधारलेला आहे.